loader image
[ays_poll id=7]

‘भीमोत्सव २०२३’ मध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी

Apr 7, 2023


मनमाड ता ७ – भारतरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भीमोत्सव २०२३’ मध्ये  भरगच्च कार्यक्रम  आयोजित करण्यात आले असून या विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर संभाजी भगत, शाहीर शीतल साठे, लेखक संजय आवटे, कुमार आहेर, एल्गार मंच, पथनाट्य आदी कार्यक्रमांची मेजवानी मनमाडकरांना मिळणार आहे. भीमोत्सवाची
सुरवात महात्मा फुले यांच्या जयंतीदिनापासून होणार आहे.

मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा आणि विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील भीम जयंती राज्यभर प्रसिद्ध आहे. गेल्या पाच वर्षांपासून शहरातील फुले शाहू आंबेडकर विचारांचे अनुयायी व्यक्तींनी एकत्र येत ना पावती ना वर्गणी या तत्वावर आपल्या स्वतःचे पैसे जमा करत एक आगळी वेगळी भीमजयंती साजरी करण्याची ठरविली. त्यानुसार ‘भीमोत्सव २०२३’ या नावाने ११ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या उत्सवाची सुरवात पथनाट्यने होणार आहे. ता. ८ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वाल्मीक रोकडे यांच्या इंडीयन ग्रुप प्रस्तुत सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर पथनाट्य सादर करून सात दिवस महापुरुषांच्या पुतळ्याजवळ जनजागृती करण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ता ११ रोजी  सायंकाळी ७ वा. येथील एकात्मता चौकात जागर समतेचा हा एल्गार सांस्कृतिक मंचचा आंबेडकरी शाहिरी जलसाचा कार्यक्रम होणार आहे. ता १२ रोजी  सायंकाळी ७ वा. येथील एकात्मता चौकात मी महात्मा फुले बोलतोय हा कुमार आहेर यांचा एकपात्री नाट्य प्रयोग ता. १३ रोजी रात्री १२ वा. अभिवादन तसेच ता. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. डॉ आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे, तर ता. १६ रोजी सायंकाळी ७ वा.
येथील एकात्मता चौकात  नवयान महाजलासा हा शाहीर शीतल साठे यांचा आंबेडकरी शाहिरी जलासा तर ता १७ रोजी सायंकाळी ७ वा. येथील एकात्मता चौकात प्रख्यात लेखक, संपादक, वक्ते संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.  तर ता १८ रोजी सायंकाळी ७ वा. येथील एकात्मता चौकात लोकशाहीर संभाजी भगत यांचा थेट ऑस्करला धडकलेला विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा होणार असल्याची माहिती भीमोत्सव आयोजन समितीचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, प्रा. डॉ. जालिंदर इंगळे, सतिष केदारे आदींनी दिली.

फोटो:

शाहीर धम्मरक्षित रणदिवे

शाहीर धम्मरक्षित रणदिवे

लोकशाहीर संभाजी भगत

कुमार आहेर

संजय आवटे

शाहीर शीतल साठे

 

 


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.