loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

Apr 8, 2023

मनमाड ता ८ :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात भीमोत्सवाला सुरवात झाली असून ,भीमोत्सव आयोजन समितीच्यावतीने महामानवांची जयंती विचारांची जयंती साजरी करण्यासाठी इंडियन्स ग्रुपच्या चौकाचौकात पथनाट्य सादर करून आवाहन करण्यात येत आहे.

भीमोत्सव आयोजन समितीचे राजेंद्र पगारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पथनट्याला सुरवात करण्यात आली. जयंती कशी साजरी करावी, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भीमोत्सव समितीचे निमंत्रक दिनकर धिवर, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, डॉ. जालिंदर इंगळे, संतोष बळीद, मयुर बोरसे, माधव शेलार, उमाकांत राय, रामदास पगारे, सचिन शिरूड, मायकल आहिरे, फिरोज शेख, राजू पवार, कादिर शेख, आम्रपाली निकम, संजय भालेराव, सुशांत केदारे, योगेश म्हस्के, श्रीकृष्ण पागरे, सुरेश आहिरे, पुंडलिक कचरे, किशोर कदम आदींसह आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीपर्यंत पथनाट्याच्या माध्यमातून चौकाचौकात भिमोत्सवाच्या निमित्ताने शाहीरी जलसा,एकपात्री प्रयोग,व्याख्यान अशी विचारांची मेजवानी असणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.