देशातील सर्व रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या लायसन कुलींची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाले असून या लायसन्स कुलींना ग्रुप डी मध्ये घ्यावे यासाठी असंघटित श्रमिक कामगार जनरल यांचे महाराष्ट्र अध्यक्ष बळवंत आव्हाड यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले
मध्य रेल्वे स्टेशन वरील परवानाधारक हमाल लायसन्स पोर्टर यांच्या ज्वलंत मागण्या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांची भेट घेऊन
सन 2006/ 2007 मध्ये विशेष खासबाब म्हणून परिपत्रक काढून परवानाधारक हमाल गँगमनआणि ट्रॅकमन आदेश रेल्वेमंत्री महोदय रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयांच्या तातडीच्या आदेश अंमलबजावणी करून अनेक परवानाधारक हमालांना रेल्वेमध्ये सामावून घेतले होते आपल्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे विशेष शिफारस करावी यासाठी असंघटित श्रमिक कामगार युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळेस असंघटित श्रमिक कामगार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी लायसन्स कुली तसेच वेंडर उपस्थित होते
मनमाड ता. २७ : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.
[contact-form][contact-field label="Name" type="name" required="true" /][contact-field...











