loader image
[ays_poll id=7]

१०० % पंचनामे केले जातील आणि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल तुम्ही धीर सोडू नका . आ. सुहास कांदे

Apr 11, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगांव तालुक्यातील घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपिट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ह्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आमदार सुहास कांदे हे थेट शेतकऱ्याचं बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १०० % पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिल. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आज आ. सुहास कांदे यांनी बोलठाण, जवळकी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार भावुक झाले. वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे लवकरात लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील.असे आश्वासन यावेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले.
या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण, मनोज रिंढे, अनिल सोनवणे, गणेश व्यवहारे, संदीप सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,बंडू पाटील,गूलाब पाटील,संतोष गायकवाड,शरद पवार,सुभाष पवार,भरत गायकवाड,नाना थोरात,अंकूश पगारे,मारुती सोनवणे,रमेश पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.