loader image
[ays_poll id=7]

मनमाड वर्कशॉप संदर्भात ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन चे ना. भारती पवार यांना निवेदन

Apr 11, 2023


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश केदारे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांना मनमाड वर्कशॉप संदर्भात निवेदन नाशिक येथे देण्यात आले.
सदर निवेदनात (१) मनमाड वर्कशॉप मध्ये नवीन वर्कऑडर मिळावी,
(२)मनमाड वर्कशॉप मध्ये रिक्त असलेल्या जागा त्वरित भरविण्यात यावे.
(३)आर.आर.सी. द्वारे होत असलेले भरती प्रक्रिया मधील उमदेवाऱ्यांची नियुक्ती मनमाड वर्कशॉप मध्ये करण्यात यावी.
(४)नाशिक ते मनमाड अप डाऊन करण्याऱ्या रेल्वे कर्मचारी वर्गासाठी देवळाली भुसावळ गाडीच्या वेळात बदल करण्यात यावा.जेणे करून रेल्वे कर्मचारी हे वेळेत कामांवर येतील.
आदी मागण्या च्या समावेश करण्यात आला होता.
यावेळी झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे,झोनल कार्यकारिणी सदस्य सुचित्रा गांगुर्डे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर नितीन केदारे, सचिन पगारे, पंकज मेश्राम, नितीन वाघ आव्हाड, मेजर, काळे मेजर, प्रशांत संसारे, तुषार पाटील, विनोद भालेराव, संतोष भंडारी, रमेश ईसमपल्ली, बोरसे आदी उपस्थित होते.

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक

लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप

नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर...

read more
.