Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Apr 14, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षात आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी व भारताला दिशा देण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. अरुण पाटील यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.गजानन शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पी. व्ही.अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बहुजन युवक संघचे उपाध्यक्ष निलेश पारधे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व बहुजन युवक संघ च्या वतीने सत्कार करण्यात आला.

बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष निलेश पारधे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे...

read more
बंगलूर घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति तर्फे समाजकंटकांचा जाहिर निषेध

बंगलूर घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति तर्फे समाजकंटकांचा जाहिर निषेध

कर्नाटकातील बंगलुरु येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटांबना केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]