loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणी जायंटस ग्रुप ऑफ नांदगाव सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा संपन्न

Apr 15, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जांयटस् वेलफेयर फाउंडेशन 2-बी आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव व नांदगांव सहेली या सर्व ग्रूपचे शपथ विधी सोहळा नुकताच पार पडला. कु.मुग्दा पटेल या कुमारीने श्री स्वागत गीत सादर करून आलेले सर्व मान्यवराचे सुस्वागतम् केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार चौधरी, प्रमुख अतिथी पद्माकर दुसाने, राजाराम मोरे, विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, फेडरेशन अध्यक्ष मेजर जगन्नाथ सालुंके, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र पारख, डॉ.गुरुदत्त राजपुत, सुमित गुप्ता, नांदगांव अध्यक्ष राजेंद्र दुसाने नांदगांव सहेली अध्यक्षा पुष्पा दुसाने आणि आलेले सर्व कॉन्सिल मेंबर्स यांनी सामूहिक प्रमाणे शपथ घेतली. आलेले पाहुने यांची भाषणे झाली. सर्वात प्रथम आलेले पहुण्यांचे सत्कार करण्यात आले. बाकी सर्व आजी-माजी अध्यक्ष, सचिव याचे पुष्प गुच्छ देऊन शब्द सुमनानीं स्वागत करण्यात आले. मग ओरियंट मीटिंग घेण्यात आली. त्यानंतर सुरुची भोजन झाले नंतर 3 बी ग्रूपचे शपथ-विधि झाले. मा.अध्यक्ष संजय पटेल, जयश्री पटेल यांनी आपले मागील अहवाल सादर केले. आणि येणाऱ्या वर्षात कश्या प्रकारे नविन कार्य करता येईल त्याची संकल्पना मांडली. नंतर कौन्सिलिग मीटिंग घेवुन आलेले सर्व आजी-माजी अध्यक्ष सचिव या सर्व प्रकारचे सूचना करण्यात आली. ज्या-ज्या ग्रुप चे अवार्ड बिडिंग झाली होती त्या सर्व ग्रूपला अवार्ड वाटण्यात आले. व चालू वर्षात कसे प्रोजेक्ट करावे आणि गरजु पर्यत कसे पोहचुन सामाजिक कार्य करावे त्याची माहिती देण्यात आली. डिसेम्बर महिन्यात केरळ मध्ये होणाऱ्या अधिवेशन साठी जास्तीत-जास्त जायंटस् परिवाराने सहभागी व्हावे अशी सूचना देण्यात आली. शेवटी नूतन अध्यक्ष राजेंद्र दुसाने आणि पुष्पा दुसाने यांनी प्रमुख पाहुने, कॉन्सिल मेंबर्स आणि सर्वाचे आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन फे.ऑफीसर दत्तराज छाजेड़, बलवंत शिंदे, प्रसाद बुरकुल यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.