loader image
[ays_poll id=7]

कलाशिक्षक देव हिरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

Apr 16, 2023

दि.१९ फेब्रुवारी २०२३ शिवजयंती निमित्ताने नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड. शाळेचे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वोत्तम लहान पोर्ट्रेट रांगोळी ( साईज २.५ सें. मी. × २.५ सें. मी.) साकारली होती. या रांगोळीची दखल सर्व वृत्तपत्र व टिव्ही न्यूज चॅनल मीडिया मार्फत घेण्यात आली होती. सदर झालेल्या रेकॉर्ड ची वर्ल्डवाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली मार्फत ऑफिशियल सर्व पडताळणी करून रेकॉर्ड पास करण्यात आले. सदर रेकॉर्ड प्रमाणपत्र,मेडल,वर्ल्ड बुक रेकॉर्ड आय.डी.कार्ड, वर्ल्ड बुक रेकॉर्ड चिन्ह, व शुभेच्छापत्र किट कुरिअर मार्फत प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ची वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचा खूप आनंद व समाधान आहे. या सर्व कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे मित्र व कलेला शुभेच्छा देणाऱ्या सर्व कलारसिक हातांचे शतशः धन्यवाद देव हिरे सर यांनी मानले आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.