बुधवार दि. 15 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 मनमाड विरुध्द एन डी सी एक माॅर्निंग क्रिकेट अकॅडमी अं-12 या संघामध्ये गोल्फ क्लब नाशिक येथे झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने एक सहज विजय प्राप्त केला. 25 षटकांच्या सामन्यामध्ये मनमाड संघाचा कर्णधार गौरव निते याने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 6 बळी गमवुन 193 धावा केल्या. यामध्ये श्लोक सोनवणे याने 9 चौकारच्या मदतीने 42 चेंडुमध्ये सर्वाधिक 50 धावा करत आपले अर्धशतक पुर्ण केले. त्यासोबतच रझा शेख 46 धावा , मयंक भालेराव 19 धावा , युवराज शर्मा 18 धावा तसेच मयुर शिंदे 16 धावा काढत संघाच्या फलंदाजीत आपले योगदान दिले. या धावांचा पाठलाग करत असताना एन डि सी ए माॅर्निंग नाशिक संघ 163 धावांपर्यतच मजल मारु शकला. मनमाड संघाने ह्या या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला व हाकीम मर्चट अंडर 12 स्पर्धेत प्रथम विजय नोंदवला.
गोलंदाजी करताना मनमाड संघातील श्लोक सोनवणे या गोलंदाजाने 02 बळी टिपले त्यासोबतच राज कोठावळे , विनित कुशारे व गौरव निते यांनी प्रत्येकी 01 बळी मिळवला.
सामण्यात 50 धावा करणारा तसेच गोलंदाजीत 02 बळी मिळवणारा श्लोक सोनवणे हा या सामन्याचा सामनावीर ठरला.
भुमी क्रिकेट अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , तय्यब शेख , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , रोहित पवार , कैलास सोनवणे दक्ष पाटिल , चिराग निफाडकर , ओम फसाले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व संचालक वाल्मिक रोकडे यांनी खेळाडुंना स्पर्धेतील पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.













