loader image

सोळा वर्षाच्या प्रतिक्षेला….. डॉक्टरच्या टिमवर्कमुळे मिळाला दिलासा

Apr 20, 2023


दोन शस्त्रक्रिया, अवघे ९०० ग्राम वजन आणि विविध व्याधीमुळे तीन महिने उपचार….. अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे बाळाला मिळाले नवजीवन. डॉ.सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने सक्षमपणे हाताळली हि अवघड केस…
नाशिक, २० एप्रिल : अशोका मेडीकव्हरच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांच्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला नवीनजीवन दिले आहे. याबद्दलची यशोगाथा अशी कि सौ. जागृती देसाई (३५ वर्षे, नाव बदललेले आहे ) यांना गर्भधारणेपूर्व रक्तदाब , थायरॉईड , व एस.एल.ई. सारख्या दुर्धर व्याधी होत्या, यामुळे गर्भधारणेला अडचणी येत होत्या, त्यामळे सोळावर्षात दोनदा गर्भधारणा होऊन हि, दोनवेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे त्यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मधील स्त्रीरोगतज्ञ डॉ श्रीकला काकतकर यांचा सल्ला व मार्गदर्शन घेण्याचे ठरवले. काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना रक्तदाब , थायरॉईड , व एस.एल.ई. सारख्या दुर्धर व्याधी असल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे गर्भधारणेपूर्व यावर उपचार करणे गरजेचे होते. डॉ श्रीकला काकतकर आणि डॉ राजवर्धन शेळके यांनी सौ जागृती देसाई यांच्यावर संयुक्त रित्या उपचाराला सुरवात केली. या उपचाराला यश प्राप्त होऊन त्यांना गर्भधारणा झाली. आणि लग्नानंतर १६ वर्षानंतर पुन्हा एकदा देसाई कुटुंबियांची आशा पल्लवित झाली. सर्वकाही सुरळीत सुरु असताना सातव्या महिन्यात आईला त्रास जाणवायला सुरवात झाली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


वरिष्ठ आणि अनुभवी बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. श्रीकला काकतकर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ मनोज पापरीकर (स्त्रीरोगतज्ञ) , डॉ. प्रणिता संघवी (स्त्रीरोगतज्ञ), डॉ निखिल कुलकर्णी (नवजात शिशु तज्ञ् ), डॉ कुणाल अहिरे (स्त्रीरोगतज्ञ) आणि डॉ. नेहा मुखी (बालरोगतज्ञ) यांच्या टीमने आई वर तातडीने उपचार सुरु केले. आईला असह्य वेदना होत होत्या त्यामुळे आईच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. त्यामुळे प्रसूती करण्याचे ठरवण्यात आले त्यामुळे बाळाला आणि आईला होणारा धोका टळला. दोन जुळी मुलं जन्माला आली एका बाळाचे वजन ९०० ग्राम आणि दुसऱ्या बाळाचे अवघे ४०० ग्राम. अकाली जन्म झाल्यामुळे बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांचा योग्य विकास झाला नसल्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता कमी दिसत होती. दुसऱ्या बाळाचे वजन अवघे ४०० ग्राम असल्यामुळे व अवयवाची वाढ नसल्यामुळे ते वाचू शकले नाही. ९०० ग्राम वजनाच्या बाळाला श्वासोस्वासचा त्रास झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि प्रगत नवजात शिशु अतिदक्षता विभागात बळावर उपचार सुरु केले.
नवजात शिशुवर उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी बाळाचे पोट फुगले त्यामुळे काही चाचण्या करण्यात आल्या त्यात असे निर्दर्शनात आले कि, शिशुच्या लहान आतड्याला छिद्र आहे आणि त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. अवघ्या पाच दिवसाच्या बाळाला व्हेंटिलेटरवर असताना भूल देऊन शस्त्रक्रिया करणे अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे होते. हि शस्त्रक्रिया लहान मुलांचे शल्य चिकित्सक डॉ बाबुलाल अग्रवाल आणि भूलतज्ज्ञ टीम डॉ हितेंद्र महाजन ,डॉ ज्योती निकाळे,डॉ निकिता पाटील , डॉ संदीप भंगाळे , डॉ मंदार गलांडे यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदर उपचार सुरु असताना १५ दिवसांनी पुन्हा हीच परिस्थिती उद्भवली त्यामुळे दुसऱयांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. हे संपूर्ण उपचार ९२ दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी चालले आणि संपूर्ण उपचारादरम्यान अनेक चढ-उतार आले. शेवटी आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले, आता दोघेही सुखरूप असून धोक्याबाहेर आहेत.
“आम्ही या आईसह २२ आठवड्यांच्या अर्भकाला वाचवण्यात यशस्वी झालो, आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे. आमच्या सर्व टीमने एकत्रितपणे ध्येय केंद्रित करून दिवस-रात्र काम केले ज्यामुळे आम्हाला आई आणि मुलाचे जीव वाचविण्यात यश मिळाले. आम्ही या कुटुंबाला त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, सर्व अडचणींना तोंड देत हे बाळ गंभीर परिस्थितीतून मोठ्या यशाने बाहेर पडले असे डॉ. सुशील पारख म्हणाले.
डॉ. सुशील पारख यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु अतिदक्षता विभागात सेवा देणारे अनुभवी कर्मचारी, एका छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व निदानात्मक सुविधांची उपलब्धता, ह्या सर्व सुविधांमुळे हे यश मिळेल आहे. असे प्रतिपादन मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे स्टेट हेड श्री. सचिन बोरसे यांनी केले.
“गेल्या काही वर्षांत, अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटलने आई आणि बाळाची काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीने अशा गंभीर केसेस हाताळण्याचे कौशल्य विकसित केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, सुमारे 15 दशलक्ष मुले प्रसूतीच्या पूर्ण कालावधीच्या आधी जन्माला येतात. भारतात, एकूण प्रसूतीपैकी, 1 टक्के बाळांचा जन्म 28 आठवड्यांपूर्वी होतो आणि 24 आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा जगण्याचा दर 0.5 टक्के इतका कमी आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.