Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

Apr 23, 2023

खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले. हा तरुण ट्रेकिंग करण्यासाठी मंकीहील पॉइंट येथे गेला होता. बचाव पथकांकडून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रात्री 11 वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन तीन तासाने म्हणजे मध्यरात्री 2 वाजता संपले. हरिश्चंद्र मंडल ( वय – 25, मूळ रा. ओरिसा, सध्या गोवा) असे या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हा पर्यटनासाठी आणि खास करून ट्रेकिंगसाठी गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करत आहे. गुरुवारी तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आला होता. खंडाळ्यातील वाघजई मंदिरापाठीमागे मंकीहिल भागातील डोंगरात फिरत असताना तो रस्ता चुकला आणि संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून सुमारे 200 फूट खोल दरीमध्ये पडला.

त्याने तो ज्या रिक्षातून प्रवास करुन घाटात फिरण्यासाठी आला होता. त्या रिक्षाचालकाला संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगून मदतीची मागणी केली. रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला.

शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळ्याचे दोन सदस्य रोपच्या सहाय्याने खाली उतरले, मात्र त्यांना हरिश्चंद्र मंडलचा अंधारात काही पत्ता लागत नव्हता आणि तो देखील घाबरलेला होता त्यामुळे कोणाच्याही हाकेला तो प्रतिसाद देत नव्हता. तरी देखील खाली उतरलेल्या दोन मेंबर्सनी त्याला शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. अखेर काही वेळाने हरिश्चंद्र मंडल सापडला. दरम्यान, सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप सुरक्षित स्थळी आणून एनर्जी ड्रिंक आणि थोडं खायला दिलं. त्यानंतर त्याला लोणावळा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]