Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थिनींनी पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ….

Apr 24, 2023

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींच्या संघाने मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धा ही रसायनशास्त्र या विषयाची असुन या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता, त्यात मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वाती काकड (तृतीय वर्ष विज्ञान), मृणाल संसारे (द्वितीय वर्ष विज्ञान) व शुभांगी पाटील (प्रथम वर्ष विज्ञान) यांच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.विजयी संघाला ट्रॉफी, सर्टिफिकेट्स व रोख बक्षीसे देण्यात आले. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी एस देसले, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. रोहित शिंदे, कुलसचिव श्री समाधान केदारे व रसायनशास्त्राच्या सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले. जेएटी महाविद्यालय मालेगाव व येवला महाविद्यालय यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

अजून बातम्या वाचा..

मुस्लिम लायब्ररी मनमाड,मुस्लिम बांधवांन तर्फे वर्ल्ड सिम्बॉल ऑफ नॉलेज,भाररत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली,

मुस्लिम लायब्ररी मनमाड,मुस्लिम बांधवांन तर्फे वर्ल्ड सिम्बॉल ऑफ नॉलेज,भाररत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली,

डॉ बाबा साहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेत भारताच्या प्रत्येक नागरिकाला मौलिक अधिकार दिलेला आहे,समता...

read more
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 वी जयंती साजरी

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 वी जयंती साजरी

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 वी जयंती...

read more
वाखारी येथील माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वाखारी येथील माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या किसान माध्यमिक विद्यालयात महामानव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]