loader image
[ays_poll id=7]

आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार, अगोदरच कर्मचारी संख्या कमी असतांना, आहे त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Apr 25, 2023


नांदगाव
नांदगाव तालुक्यातील घाटमाथा या भागातील बोलठाण / जातेगाव येथील आरोग्य सेवेचा बोजवारा
घाटमाथ्यावरील बोलठाण / जातेगाव येथे व्यापार पेठ असून तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत खुद्द बोलठाण, जातेगांव आणि कासारी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. हे तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घाटमाथ्याची ओळख आहे. येथे अगोदर पासून सहा कर्मचारी संख्या रिक्त आहेत. असे असतांना नांदगाव तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक दिगंबर जोशी यांना वैद्यकीय अनफिट दाखवून त्यांच्या जागेवर दुसरा कर्मचारी नसतांना जोशी यांच्या बदलीची शिफारस केली, व कार्यमुक्त केले . त्यांना कोणत्या नियमाने अनफिट या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोलठाण आरोग्य केंद्रास एकूण १७ गावे, आणि ९ वाड्या-वस्त्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बोलठाण प्रा.आ.केंद्र अंतर्गत सर्व गावे आणि वाड्या वस्त्याची ३६४०० एवढी लोकसंख्या जोडलेली आहे. तसेच वरील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना प्रत्यक्ष आवश्यक गरज असलेल्या कर्मचार्यांची संख्या २९ अपेक्षित असून, मागील १२ ते १३ वर्षांपासून कर्मचारी संख्येला गळती लागली आहे. सध्या कार्यरत असलेले कर्मचारी पुढीलप्रमाणे असून कंसात कमी असलेल्या कर्मचार्यांची संख्या आहे. वैद्यकीय अधिकारी १, सह‌वैद्यकीय अधिकारी १, जातेगांव आणि कासारी येथील आरोग्य उप केंद्रासाठी समुदाय वैद्यकीय अधिकारी २, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद एक (ते ही एक पद रिक्त), औषधी निर्माण अधिकारी पद एक ते ही (१२वर्षापासून रिक्त) (आरोग्य सहाय्यक पदे दोन त्यापैकी मलेरिया विभाग महाराष्ट्र शासन एक पद मागील १० वर्षांपूर्वी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त आहे व दुसरे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या कडून असलेले दिगंबर जोशी यांची देखील बदली अधिकाराचा गैरवापर करून स्थानिक अधिकार्यांनी कुठलाही विचार न करता केली आहे, त्यामुळे हे दोन्ही पदे रिक्त झाले आहे आरोग्य सेवक पदे ३ पैकी (रिक्त पदे दोन), आरोग्य सेविका पदे ३(रिक्त एक), परिचर ४ पदे (रिक्त एक) वरील पैकी हजर कर्मचार्यांपैकी सध्या कायम स्वरुपी १० कर्मचारी आणि तात्पुरत्या स्वरूपात १२ नियुक्ती असलेले कर्मचारी संख्या असून रिक्त ६ कर्मचारी कमी आहे.

असे असतांना न्यायडोंगरी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांची लोक संख्ये पेक्षा बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या दुपटीने जास्त आहे, तरी येथील दिगंबर जोशी यांची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जोशी यांच्या बदल्यात दुसरा कर्मचारी नसतांना त्यांना कोणत्या नियमावली नुसार येथून कार्यमुक्त केले. काही दिवसांवर पावसाळा सुरु होईल अशा परिस्थितीत जर काही साथीच्या आजाराने उद्रेक केला, तर याची जबाबदारी कोण घेणार. येथील आरोग्य सहाय्यकाची बदलीची शिफारस करतांना येथे दुसरा कर्मचारी नाही हा मुद्दा का लक्षात घेण्यात आला नाही, व पर्यायी व्यवस्था नसतांना कोणत्या नियमावली नुसार करण्यात आली आहे, याबाबत काही अर्थकारण दडलं आहे का? अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

दिगंबर जोशी या कर्मचाऱ्याच्या जागेवर दुसरा कर्मचारी आल्याशिवाय पदमुक्त करु नये याबाबत सुचना देण्यात येतील. असेच बोलठाण येथे आवश्यक असलेल्या २९ कर्मचाऱ्यांपैकी मागील अनेक वर्षांपासून सेवा निवृत्त झालेले व बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लाक्षणिक असुन, या आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र व लोक संख्येचा विचार करता, येथे कमी असलेल्या कर्मचार्यांचा आढावा घेऊन पुरेशी कर्मचारी संख्या देण्यात येईल.
आ.सुहास कांदे

बोलठाण प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रासाठी रिक्त असलेले आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेवक यांची तात्काळ आठ ते दहा दिवसांत नियुक्ती करणेबाबत आदेश देण्यात येतील, त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी दिगंबर जोशी या आरोग्य सहाय्यकाची बदली नवीन कर्मचारी नियुक्त होईपर्यंत रद्द करण्यात येईल.

डॉ.हर्षल नेहते जिल्हा वैद्यकीय अधिकारी


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.