मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असुन महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे. मनमाडला सध्या १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते. शहरातील वागदर्डी व पाटोदा साठवणूक तलावात महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणाच्या आवर्तनावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मनमाड 2022 वतीने आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास...











