मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असुन महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे. मनमाडला सध्या १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते. शहरातील वागदर्डी व पाटोदा साठवणूक तलावात महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणाच्या आवर्तनावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
पावसाळी पर्यटन करायचंय – आता घ्यावी लागणार ऑनलाईन परवानगी
पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गर्दी...









