loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात संशोधनाच्या संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न ….

Apr 30, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, च्या रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांसाठी परदेशात संशोधनाच्या संधी या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न झाले. या वेबिनारसाठी युनिव्हर्सिटाट पॉलिटेक्निका दी व्हॅलेंसिया या स्पेन मधील विद्यापीठाच्या पोस्ट डॉक्टराल रिसर्च फेलो डॉ. अमरावती एस. सिंग यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. या वेबिनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात रसायनशास्त्र हा विषय विज्ञानशाखेत अग्रणी असून या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनात खूप संधी असल्याचे मत व्यक्त केले व वेबिनारसाठी शुभेच्छा दिल्या. साधन व्यक्ती म्हणून लाभलेल्या डॉ. अमरावती सिंग यांनी संशोधन म्हणजे काय?, रसायनशास्त्र विषयात संशोधन प्रक्रिया कशी असते, भारताबाहेर कुठल्या देशात संशोधनाच्या अधिक संधी आहेत, परदेशात संशोधनाचे फायदे, परदेशात संशोधनासाठी लागणारी गुणवत्ता, यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. सदर वेबिनार हे अतिशय उत्साहवर्धक व प्रेरणादायी असल्याचे मत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी एस देसले, आयक्यूएसी व नॅक कॉर्डिनेटर डॉ. मिलिंद अहिरे कुलसचिव श्री समाधान केदारे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेबिनारचे कॉर्डिनेटरचे डॉ. राहुल शिंदे यांनी केले व साधन व्यक्तींचा परिचय व आभार प्रदर्शन अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा.रोहित शिंदे यांनी केले. या वेबिनारसाठी समन्वयक डॉ. राहुल शिंदे आणि प्रा. रोहित शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच डॉक्टर पवनसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांसाठी ICT फॅसिलिटी ची व्यवस्था केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.