loader image
[ays_poll id=7]

कामगारदिनी महावितरणच्या ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव

May 2, 2023


तांत्रिक कामगार महावितरण आणि ग्राहकांमधील थेट दुवा

अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांचे प्रतिपादन

 

 

नाशिक : दि. ०२ मे २०२३

महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले महावितरणचे तांत्रिक कामगार महावितरण आणि ग्राहक यामधील थेट दुवा असून त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना गुणवंत कामगार म्हणून सन्मानित करताना मला आनंद वाटत असून त्यांनी काळानुरूप बदल करून यापेक्षा आणखी उच्चतम ग्राहक सेवा देवून महावितरणची प्रतिमा आणखी उजळावी असे आवाहन महावितरणच्या नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले, ते कामगारदिनी विद्युत भवन आवारात आयोजित गुणवंत कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.

०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नाशिकरोड येथील महावितरणच्या विद्युत भवनाच्या प्रांगणात अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर नाशिक परिमंडळातील ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञ यांचा गेल्या वर्षभरात त्यांनी केलेल्या विविध व विशेष कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले उपस्थित होते. यावेळी महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक-जळगाव परिमंडळाला क्रिकेट या सांघिक खेळामध्ये उपविजेतेपद मिळविल्यामुळे खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात यंत्रचालक ज्ञानेश अवसरकर व गणेश कुंभारे, जनमित्र प्रविण सोनवणे यांनी समयोचीत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, राजाराम डोंगरे, माणिकलाल तपासे, निलेश चालीकवार व प्रेरणा बनकर, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी यांचेसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक मंगेश गाढे यांनी तर प्रास्ताविक उपमुख्य संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी केले. आभार प्रदर्शन मनोज वानखेडे यांनी केले.

नाशिक मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- ज्ञानेश अवसकर (म्हसरूळ), कैलास पाटील (उपनगर), अनिल नाईक (वावी), महेंद्रसिंग मगर (चिखलांबे). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय – शैलेश मोगले (तपोवन), सोमनाथ ब्राह्मणे (सातपुर उपविभाग), सुनिल बागुल (नाशिक अंबड), राहुल पारळे (भद्रकाली २), संतोष जाधव (उपनगर), वैभव कांडेकर (इंदिरानगर), प्रविण अहिरे (देवळाली गाव), संतोष पवार (सय्यद पिंप्री), समाधान पाटील (सातपुर ग्रामीण), सुनील माळुंजकर (बेळगाव ढगा), संतोष गांगोडे (करंजवण), प्रविण तरवारे (वाडीवऱ्हे), निर्मला मथुरे (पांढुर्ली), आरिफ काद्री (वावी), मोहन भोये (पेठ शहर), अजय पगार (सायखेडा शहर), ज्ञानेश्वर चव्हाण (कसबे सुकणे), गोवर्धन शिंदे (चांदवड ग्रामीण १), संतोष चौरे (देवगाव), आनंदा गांगुर्डे (पालखेड).

मालेगाव मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- शरद मोरे (अजमेर सौदाने), विष्णू गायकवाड (बोरगाव), बापू चव्हाण (कळवाडी), कैलाशकुमार चौरे (नांदगाव). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय – योगेश निकम (नामपूर ग्रामीण), प्रविण सोनवणे (सटाणा ग्रामीण १), प्रदिप निळे (ठेंगोडा), यादव भोये (देसराने), किरण देशमुख (बोरगाव), सुभाष चव्हाण (आघार), रोहिदास अहिरे (कळवाडी), दिपक जाधव (पाटणे), रमेश शिर्के (मनमाड ग्रामीण १), सुनिल सोनवणे (अंदरसूल २), सागर दाणेच (जळगाव नेऊर), सागर खैरणार (नांदगाव ग्रामीण).

अहमदनगर मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- संजय पाडेकर (वडगाव पान), नितीन सोनवणे (देवळाली प्रवरा), गणेश तिखे (कर्जत), रावसाहेब दहिफळे (चांदा), गणेश कुंभारे (केडगाव). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय – भुषण पाटील (कोपरगाव ग्रामीण २), गणेश मूंगसे (तळेगाव), नवनाथ अभाळे (घारगाव २), भूषण सपकाळे (अकोले शहर), दत्तू भोईर (शेंडी), नवनाथ जाधव (चासनळी), महेश बनकर (शिर्डी शहर), श्रीगणेश गंधाडे (ढवळगाव), शंकर डाडर (जामखेड), राजू तांबोळी (काष्टी १), प्रशांत कांबळे (कर्जत १), दिनेश भोये (सूतगिरणी), महेंद्र धकचवले (राहुरी ग्रामीण), नारायण घोरपडे (लोणी १), वैभव आंबेकर (कोल्हार), शांताराम गवळी (घोडेगाव शहर), लहू गरगडे (नेवासा शहर), अर्जुन बडे (कोरडगाव), नासेर काझी (शेवगाव शहर), दिपक गांगुर्डे (माळीवाडा), वैभव नेमाने (दिल्लीगेट), सचिन बोरुडे (जखणगाव), प्रकाश पुंड (वडझिरे), संदिप अमृते (अहमदनगर चाचणी विभाग).

फोटोओळ- गुणवंत कर्मचारी यांच्या समवेत अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व उपस्थित मान्यवर.
———————————–


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.