कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या संचालकपदी आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते प्रकाश तथा बापूसाहेब कवडे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते श्री. कवडे हे १९८० पासून सलग संचालक असून, मधल्या काळात त्यांनी संघाचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. तर आमदार कांदे हेदेखील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून जिल्हा संघाचे संचालक आहेत. ते दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक झाले आहेत. मंगळवारी झालेल्या जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या निवडणुकीत आमदार कांदे व श्री. कवडे यांची बिनविरोध झाल्याबद्दल समर्थकांनी जल्लोष केला.
आता ‘आपले सरकार’ द्वारे मिळणार ग्रामविकास विभागाच्या ‘या’ सेवा
'आपले सरकार’ पोर्टलवर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत खालील ७ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत....











