मनमाड शहरातील मोबाईल जंक्शन ह्या दुकानातून योगेश्वर चंद्रभान जाधव यांनी मोबाईल खरेदी केला होता व ह्या व्यव्हारापोटी चेक दिला होता. सदरील चेक बँकेत न वटल्यामुळे त्यांचे विरुद्ध मनमाड येथिल फौजदारी न्यायालयात नि.इ.अ. १३८ प्रमाणे क्रि.के.नं. २५७/२०१८ हो केस दाखल केलेली होती. सदरील केसचे कामकाज चालुन त्यामध्ये आरोपी योगेश्वर चंदभान जाधव यास मे. कोर्टाने चेकची रक्कम रु.२१,०००/- चे दुप्पट रु.४२,०००/- चा दंड व दोन महिने शिक्षा दिलेली आहे. फिर्यादीचे वतीने अॅडव्होकेट संजय गांधी मनमाड यांनी कामकाज पाहीले. सदरील खटल्याचा निकाल मनमाड येथिल मे. ज्युडिशिअल मजिस्ट्रेट साहेब सौ. शलाका लोमटे साहेब प्रथम वर्ग यांनी दि. ०४/०५/२०२३ रोजी दिला आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












