loader image
[ays_poll id=7]

सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

May 12, 2023


सरकारी रुग्णालयांत येणाऱ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही आरोग्य संस्थेत घडणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आदेश आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सकांसह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले असून, केस पेपरवरील जातीचा रकानाही वगळण्यात येणार आहे.

 

 

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना केस पेपर काढतेवेळी जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात पुढे आला होता. या घटनेचे संतप्त पडसाद अजूनही उमटत आहेत. रुग्णाची जात विचारात घेऊन मग उपचार केले जाणार का, असा सवालही उपस्थित झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकाराचा निषेध नोंदविला. या एकूणच प्रकाराची आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे या एकूणच प्रकाराचा अहवाल मागविला होता. हा अहवाल अभ्यासल्यानंतर धीरज कुमार यांनी राज्यातील सर्वच सरकारी आरोग्य यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश काढले आहेत.

 

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत तेथील वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांना अहवाल सादर केला आहे. त्या आधारे डॉ. थोरात यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे अभिप्राय सादर केला आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयात केसपेपर वर जातीचा उल्लेख करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने महाराष्ट्रात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या विरोधात टिका केली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहित इतर संघटनानी निषेध करून त्या विरोधात आवाज उठविला होता. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी ‘जात पाहून उपचार करणार का? अशा संतप्त सवाल उपस्थित केला होता. दरम्यान आता आरोग्य प्रशासनाने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याने या लढ्याला आता यश आले असल्याचे अंनिसने म्हटले आहे. 

 

 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागांकडून वेळोवेळी मागितली जाते. बऱ्याच योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. विविध योजनांकरिता उपलब्ध करून दिलेले अनुदान व अनुदानाची तरतूद व झालेला खर्च याबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांकडून आढावा घेण्यात येतो. लाभाथ्र्यांची संख्याही विचारली जाते. संबंधित विभागांना अनुदानाचे नियोजन करणे, वितरण करणे आणि खर्चाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी या माहितीची आवश्यकता असते असे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकांनी अभिप्रायातून दिले .

 

दरम्यान आरोग्य विभाग आयुक्तांनी याबाबत आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे सूचना संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. त्यानुसार लाभार्थींना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही आरोग्य संस्थेमध्ये घडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. यापुढे केस पेपरवर जात/जमात किंवा पोटजात अशी नोंद न घेता लाभाच्यांची माहिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग या सामाजिक प्रवर्गानुसारच नोंदविण्यात यावी. सामाजिक प्रवर्गानुसार नोंद घेणे आवश्यक. नोंदणी शाखेतील कर्मचाऱ्यांचे आणि गरज भासल्यास लाभाथ्र्यांचे योग्य समुपदेशन करावे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.