loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 12, 2023


भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नाशिकचे भूमीपूत्र श्री योगेश्वर कांडाळकर यांची प्रमुख उपस्थिती.
नाशिक : १२ मे , जागतिक परिचारिका दिनाच्या सन्मानार्थ, आज जगभरातील परिचारिकांचे योगदान साजरे करण्यात येते, ‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य’ ही यंदाची थीम आहे. या थीमद्वारे, जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी नर्सिंगचे भविष्य काय हवे आहे. हे घडवण्यात परिचारिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. याच अनुषंगाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे जागतिक परिचारिका दिन भारतीय हवाई दलाचे गृप कॅप्टन श्री योगेश्वर कांडाळकर यांच्या प्रमुख उपस्थित साजरा काण्यात आला.
या विशेष प्रसंगी भारतीय हवाई दलाचे गृप कॅप्टन श्री योगेश्वर कांडाळकर यांच्या गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये झारखंडमधील त्रिकुट पर्वतावरील रोप-वेमध्ये बिघाड झाला होता.त्यावेळी हवेत अडकलेल्या ३५ पर्यटकांची यशस्वी सुटका करत त्यांचे प्राण वाचवले होते. यानिमीत्त त्यांना राष्ट्रपती याच्या हस्ते देशातील तिसरे सर्वोच्च शांतताकालीन ‘शौर्य चक्र’ पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. नाशिकचे भूमिपुत्र म्हणून या विशेष प्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे त्यांचा सत्कार स्टेट हेड सचिन बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी परिचारिकांना मार्गदर्शन करतांना योगेश्वर कांडाळकर म्हणाले कि , या वर्षीची थीम आरोग्यसेवेतील प्रमुख म्हणून परिचारिकांचे महत्त्व अधोरेखित करते. आरोग्य सेवा प्रणालींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, त्यांचे कौशल्य आणि अद्वितीय दृष्टीकोन हे आरोग्यसेवेच्या भविष्याला आकार देण्यासाठी अमूल्य आहेत. रुग्णालयांमध्ये डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असले तरी त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी परिचारिकांवर असते. कोरोना महामारीच्या काळात जगभरातील परिचारिकांनी कौतुकास्पद काम केले आहे . आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या प्रियजनांपासून दूर राहून परिचारिकांनी साथीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची सेवा त्यांनी केली आहे . वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष आहेच.

या जागतिक परिचारिका दिनानिमित्त, आम्ही जगभरातील परिचारिकांच्या समर्पण, करुणा आणि कौशल्याला सलाम करतो. सर्वांसाठी उज्वल, आरोग्यदायी भविष्याकडे वाटचाल करत असताना आपण परिचारिकांना सपोर्ट आणि सशक्त करत राहू या.आव्हाने असूनही, परिचारिका रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी त्यांच्या वचनबद्धतेत सकारात्मक राहिल्या आहेत. त्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांशी जुळवून घेतले आहे, इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत सहकार्य केले आहे आणि सार्वजनिक आरोग्य धोरणे विकसित आणि अंमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका परिचारिकांनी बजावली आहे.असे प्रतिपादन सचिन बोरसे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रिजनल हेड समीर तुळजापूरकर ,सेंटर हेड डॉ सौरभ नागर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर , ऑपरेशन हेड आशिष सिंग, एच आर हेड नीरज नायर , सूत्रसंचालन पूनम लोखंडे तर आभार प्रदर्शन नर्सिंग हेड राजेश कुमार, यांनी केले. या कार्यक्रमास हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थतीत होते


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.