. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे झालेल्या नंदुरबार अंडर 16 जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाण या खेळाडुंची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय सामने ) स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघामध्ये निवड झाली. धुळे व जळगाव येथे 15 मे 2023 पासुन ते 29 मे पर्यत हे सामने खेळवले जात आहेत. धुळे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड वर झालेल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही गोलंदाजाने अत्यंत चांगली कामगिरी करत तीन बळी मिळवले. रुषी शर्माने 15 षटकांत 7 निर्धाव षटक टाकुन 28 धावा देत तीन बळी मिळवले तसेच 12.3 षटकात 3 निर्धाव षटक व 25 धावा देत तीन बळी अध्ययन चव्हाणने मिळवले. या खेळाडुंचे यापुढील तीन सामने हे जळगाव जिल्हा येथे खेळवले जाणार आहे.
या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे हे नंदुरबार संघाचे ही प्रशिक्षक व संघव्यवस्थापकाची जबाबदारी नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघासाठी पार पाडत आहेत.
या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करुन रुषी व अध्ययन महाराष्ट्र राज्यांच्या संघात सामील होऊन मनमाडसाठी रणजी खेळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मनमाड शहरातुन सातत्याने रूषी शर्मा हा जिल्हा संघासाठी खेळत आहे. रुषी व अध्ययनच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन जागोजागी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी रुषी व अध्ययन यांचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन , मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा व अध्ययन चव्हाण यांचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.













