Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेनेचे महावितरण कार्यालयात “कंदील जलाव” आंदोलन

May 17, 2023

गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित भारनियमन सुरू असून, सातत्याने वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले असून मंगळवारी मनमाड शहर शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात ‘कंदील जलाव’ आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर कंदील आणि मेणबत्ती लावून व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा वीजग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा संघटक संजय कटारीया, तालुका संघटक संतोष जगताप, शहरप्रमुख माधव शेलार, तालुका उपप्रमुख अशोक पदमर आदी उपविभागीय कार्यालयात गेले असता कार्यकारी अभियंता अनुपस्थित होते. त्यांच्या टेबलवर कंदील आणि मेणबत्ती पेटवून निषेध नोंदवत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, त्यात म्हटले आहे, की अनेक भागांत आठ तास वीजपुरवठा खंडीत होत आहे. अर्बन-२ मध्ये केव्हाही वीजपुरवठा खंडीत होतो. अधिकारी, लाईनमन वायरमन यांचे फोन बंद असतात. भोंगळ कारभारामुळे माहिती मिळत नाही. बील भरण्यास विलंब झाल्यास लगेच वीजपुरवठा खंडितकेला जातो. बिले कमी करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. मीटर रिडींग न घेता भरमसाठ बिले दिली जातात. कोटेशन भरुनही वीज मीटरदिले जात नाही. अनेक वायरमन कर्मचाऱ्यांनी वीज बिलाचे रोख पैसे घेतले. मात्र, अद्याप विल भरले नाही, तांत्रिक अडचणींच्या नावाखाली अघोषित भारनियमन होत असल्यास तसे कळविणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा इशारा श्री. बळीद यांनी दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

बोलठाण गावचा लाडका भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला अमोलदादा हिम्मतराव पाटील यांना वीरमरण

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नांदगाव तालुक्यातील बोलठाण चे भूमिपुत्र अमोल हिम्मतराव पाटील हे...

read more

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more

कोरोना-ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन शाळा-महाविद्यालय सरसकट नियमित सुरू करण्याची अध्यापकभारतीची मागणी

कोरोना व ओमीक्रोन संसर्गाच्या नियमांचे पालन करत सरकारी,निमसरकारी उद्योग-व्यवसाय व कार्यालयीन...

read more

दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी २३ कोटी मंजूर : आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश

" शिवसेना आपल्या दारी " या अभियानांतर्गत जनतेच्या भेटी घेताना निदर्शनास आलेल्या प्रश्नांना तडीस...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]