loader image
[ays_poll id=7]

मुख्याध्यापक शिक्षकाने केला शालकाचा खुन

May 17, 2023

नांदगाव
नांदगाव शहरातील आनंदनगर येथे  दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने घाव घालीत ठार मारल्याची घटना मंगळवारी(दि.१६)रोजी  रात्री घडली असून संशयित खुनाचा आरोप असलेला आरोपी नगरपालिका शाळेचा मुख्याध्यापक असल्याने घटनेची नांदगाव शहरात दिवसभर चर्चा होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेला वाल्मीक साहेबराव ठाकूर(३५) हा सुरत येथे खाजगी नोकरीला होता काही दिवसांपूर्वी तो आपल्या स्वतःच्या घरी नांदगावी आला होता. त्यावेळी त्याने दारुच्या नशेत आई वडिलांना मारहाण केली होती. मंगळवारी(दि.१६ ) त्याचे मेहुणे ईश्वर देवराम ठाकुर व चुलत भाऊ प्रदीप निवृत्ती ठाकुर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता वाल्मिकची दोघांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतर आरोपी ईश्वर ठाकुर याने प्रदीपला मी याला माझ्या पध्दतीने समजावतो असे सांगितले. घरी परतल्यावर प्रदीपला शेजारील काकांच्या घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने जाऊन पाहिले असता आरोपी शालकाच्या डोक्यावर व पायावर हतोड्याने घाव घालत होता. यावेळी आरोपीने प्रदीपला कुणाला काहीही  सांगितले तर तुझीही अशी अवस्थेत करेल असा दम भरला. अर्ध्या तासानंतर आरोपीने रुग्णवाहिका बोलावून वाल्मीकला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी फिर्याद प्रदीप ठाकुर याने नांदगाव पोलिसांत दिली आहे. 

उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, सागर कुमावत, भारत कांदळकर, नंदकिशोर पिंपळे घटनेचा तपस करत आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.