loader image
[ays_poll id=7]

पतसंस्थेला दिलेला धनादेश वटला नाही – कर्जदारास दोन महिने कारावास

May 22, 2023

पंधरा हजार रुपायांचा चेक बाऊंस झाल्याप्रकरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदार कल्पना भाऊसाहेब नेमनार यांना न्यायालयाने दोन महिने कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पतसंस्थेतून दहेगाव (ता. चांदवड) येथील कल्पना नेमनार यांनी वैयक्तिक कारणासाठी १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात कर्जदार यांनी पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी ५० हजार रुपयाचा धनादेश दिला होता. मात्र, दिलेला धनादेश पास न होता बाऊंस झाला. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात उभय बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मनमाडच्या न्यायदंडाधिकारी एस. ए. लोमटे यांनी कर्जदारास दोन महिने कारावास व एक लाख रुपये नुकसानभरपाईची शिक्षा ठोठावली. पतसंस्थेतर्फे अॅड. महेश प्रभाकर पाटील यांनी कामकाज पाहिले. पतसंस्थेचे व्यवस्थापक रामदास दत्तू दुभासे यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.