दिंडोरी लोकसभा मतदार संघातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदार संघा च्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ सौ भारती प्रविण पवार यांचे संकल्पने ने आणि मार्गदर्शनाने संपूर्ण मतदार संघात तालुका /जिल्हास्तरीय खासदार चषक क्रीडा स्पर्धा चे आयोजन शनिवार दिनांक 27 मे 2023 ते 29 मे 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. त्याच अंतर्गत मनमाड शहरात भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जय फुलवाणी यांचे नेतृत्वा मध्ये मनमाड क्रिकेट समिती, तथा नासिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे सहकार्य ने भगवान महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण (रेल्वे इन्सिट्यूट )येथे कबड्डी स्पर्धा चे आयोजन केले आहे. क्रिकेट स्पर्धे साठी खेळाडूंनी नितीन अहिरराव (8806151117) क्रीडा प्रशिक्षक मनोज ठोंबरे सर (8329971454) क्रीडा शिक्षक जावेद शेख सर (9850755252) देवेंद्र चुनियान (7972195618) तर कबड्डी स्पर्धेसाठी संदीप नरवडे (9096989111)शाकीर खान (7020362663) नितीन परदेशी (7350999378)अकबर शहा (9665545234)आदी प्रमुख संयोजकांशी संपर्क करावा या तालुका स्तरीय स्पर्धेत विजयी संघाला प्रथम पारितोषिक रोख रुपये 15000/- तर उप विजेता संघाला रोख रुपये 11000/- त्याच प्रमाणे खेळा प्रमाणे व्यक्तिगत पारितोषिक तसेच सर्व सहभागी खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या तालुका स्पर्धेतून विजेता संघ बुधवार दिनांक 31मे 2023 रोजी श्री नेमिनाथ जैन ब्राम्ह्चार्यश्रम चांदवड येथे संपन्न होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होईल. मनमाड शहरातील कबड्डी व क्रिकेट खेळाडू नी या खासदार चषक स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












