महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय ) अंडर 16 स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा या खेळाडुने नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघामध्ये खेळत असताना पुण्यातील स्टार अंडर 16 संघासमोर जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पुर्ण केले. जळगाव येथे हा सामना खेळवला गेला. ज्यात नंदुरबार संघाला हार पत्करावी लागली परंतु मनमाडच्या या किशोरवयीन खेळाडुची कामगीरी उत्तम अशी ठरली. गोलंदाजी करताना 17 षटकात 5 निर्धाव षटक करत 3 बळी ही रुषीने मिळविले. फलंदाजी करताना 84 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या तसेच मनमाड मधील अध्ययन चव्हाण याने देखील या सामण्यात 1 बळी मिळवला. रुषीच्या या अष्टपैलु खेळीसाठी जिल्हासंघात त्याचे कौतुक करण्यात आले.
मनमाड शहरातुन सातत्याने रूषी शर्मा हा जिल्हा संघासाठी खेळत आहे. रुषी व अध्ययनच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन जागोजागी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी रुषी व अध्ययन यांचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन , मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , श्रेणिक बरडिया , तय्यब शेख , हबीब शेख , सिध्दार्थ बरडिया , परवेज शेख , कौशल शर्मा , सनी फसाटे , परेश राऊत
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे रुषी शर्मा व अध्ययन चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.













