loader image
[ays_poll id=7]

सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा ३ जून रोजी वडनेर भैरव येथे -खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

May 31, 2023


शनिवारी ३जुन ला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्तरीय सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा वडनेर भैरव ता. चांदवड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री गौत्तम बापू पाटील हे असणार आहे अशी माहिती आयोजक श्री. मनोहर नाना पाटोळे, उपाध्यक्ष श्री. रामचंद्र आप्पा मोरे सचिव राहुल पाचोरकर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.

राज्य स्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या सलादे बाबा कला क्रीडा व कृषी मंडळ यांच्या वतीने हा नाशिक, धुळे, जळगांव, नगर आणि नंदूरबार या पाच जिल्हयातील प्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान सलादे बाबा कला क्रीडा व कृषी मंडळ ट्रस्ट च्या वतीने तीस शेतकरी यांचा सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक ३/६/२०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता जनता विद्यालय वडनेर भैरव ता. चांदवड जिल्हा नाशिक येथे होईल.या सन्मान सोहळ्यास विशेष उपस्थिती विधानसभा उपाधक्ष नामदार नरहरी झिरवाळ हे असणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे खासदार संजय राउत यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होत आहे. यावेळी कादवा कारखाना चेअरमन श्रीराम शेटे, आमदार दिलीप काका बनकर, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, काँग्रेस आय जिल्हा शेतकरी अध्यक्ष संपतराव वक्ते,माजी आमदार अनिल कदम, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, उपनेते अद्वय हिरे, उपनेते सुनील बागुल, जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, मविप्र संचालक डॉ. सयाजी गायकवाड, जिल्हा प्रहार उपाध्यक्ष श्री. गणेश निमबाळकर, शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर, कादवा संचालक सुभाष शिंदे, कादवा संचालक सुखदेव जाधव, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष संजय जाधव, उपाद्यक्ष कारभारी आहेर, डॉ. आत्माराम कुमाई, हे असणार आहे. कार्यक्रम अध्यक्ष गौतम बापू पाटील हे असणार आहे.यावेळी कादवा कारखाना व्हाईस चेअरमन श्री. शिवाजी दादा बस्ते, निवृत्ती माळी, कोंडाजी नाना पाचोरकर, भास्करराव पांडुरंग निफाडे, श्री. दौलतराव भालेराव यांना कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकरी यांना जीवनगौरव हा सन्मान दिले जाणार आहे.

जनता विद्यालय वडनेर भैरव येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय तीस शेतकरी यांना बळीराजा गौरव सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी सल्लागार दत्तात्रय निखाडे विश्वस्त दीपक पाचोरकर,सुरेश तात्या उशीर, महेंद्रसिंग परदेशी,अनिल पवार, उत्तम भोसले, जमदाडे कायदेशीर सल्लागार पोपटराव पवार,कार्यक्रमाचे संयोजक श्री दत्तात्रय शिंदे मानसिंग धोंमसे युवराज सगर हे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात  सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

मनमाड - आज समस्त विश्वातील हिंदूना गर्व अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली...

read more
बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

मनमाड - ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला...

read more
टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त...

read more
.