loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

May 31, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील शाकांबरी व लेडीं नदीच्या संगमावर असलेल्या उद्यानात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन संपन्न झाले.

येत्या दोन महिन्यात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य असे ना भूतो ना भविष्य असे अनावरण सोहळा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भुमीपुजनप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी केले.

नांदगाव तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षंपासूनची मागणी आज पूर्ण होत आहेत. जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर बुधवार (दि.३१) रोजी दुपारी ४ वाजता नगरपालिका उद्यान शनी मंदिर पुलाजवळ, नांदगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन आमदार सुहास  कांदे व  सौ.अंजूम कांदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

याप्रसंगी जेष्ठ नेते बापुसाहेब कवडे,कृ.उबा.सभापती अर्जुन पाटील,एकनाथ सदगीर,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, साईनाथ गिडगे, डॉ. संजय सागळे ,योगेश पाटील, समाधान पाटील,शिवाजी पाटील, राजेश शिदे,

तहसीलदार सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, मुख्यधिकारी विवेक धांडे, किरण देवरे,प्रमोद भाबड,अमोल नांवदर,नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय नेते,  शिवसेना पदाधिकारी, कृउबा संचालक मंडळ, धनगर समाज  बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.