सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी जय भवानी व्यायामशाळा व कला वाणिज्य व वीज्ञान महाविद्यालय मनमाड ची खेळाडू साक्षी भाऊसाहेब वानखेडे हिची दिल्ली येथे ६ते१२ जून २०२३ दरम्यान होणाऱ्या १९ वर्षाआतील मुलींच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.कोरोना कालखंडात खंडित झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन जवळपास तीन वर्षानंतर होत असल्याने खेळाडूंमधे उत्साहाचे वातावरण आहे.आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करण्यासाठी साक्षी सज्ज झाली आहे
साक्षी ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार ऐस ऐस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या













