loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे गुड मार्निंग ग्रुपच्या वतीने ‘लालपरीचा’ 75 वा वाढदिवस साजरा….

Jun 3, 2023

मनमाड : येथे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांची रोजची जीवन वाहिनी असणारी ‘लालपरी’ अर्थात एसटीचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यांपासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे , अनेक वाड्या आणि खेड्यांपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्‍काचे वाहन म्हणजे एस.टी होय. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला जागणारी जनसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात एसटी यंदाच्या वर्षी आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.

१ जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली एस.टी धावली. यादिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुड मार्निंग ग्रुपच्या वतीने लासलगाव फाटा येथे मनमाड-नांदूरगड एसटीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रवीण शार्दुल , राजेंद्र जाधव , विवेक उबाळे , श्री गोयल, योगेश म्हस्के आदी सदस्य उपस्थित होते.सर्व एसटी कर्मचारी व प्रवासी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.!

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे  आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

  नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे...

read more
लक्ष्मीनगर(नांदगाव)श्री.लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न  नांदगाव सोमनाथ घोंगाणे

लक्ष्मीनगर(नांदगाव)श्री.लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन सौ.अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे श्री लक्ष्मीमाता देवीचे मंदीर बांधण्याची कॉलनीतील नागरिकांची ईच्छा...

read more
कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावा: महावितरण

मुंबई/नाशिक, दि.२० फेब्रुवारी २०२३ : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे...

read more
.