भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 देशांचे संमेलन होणार आहे. या जी 20 संमेलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय संघटन यांनी भारतातील सर्व केंद्रीय विद्यालयांमध्ये जी 20 विविध उपक्रम राबवले.त्या अनुषंगाने केंद्रीय विद्यालय मनमाड मध्ये दिनांक एक जून पासून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे उपक्रम ऑनलाइन माध्यमातून राबवण्यात आले . इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जी 20 संमेलनावर आधारित चित्र काढणे, क्राफ्ट तयार करणे, कथा लिहिणे , जी 20 संमेलनावर आधारित डॉक्युमेंटरी दाखवणे . मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल शिक्षण यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले.केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले. हे उपक्रम यशस्वीततेसाठी केंद्रीय विद्यालयातील विनोद माळी, अनिल जींजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड, महेंद्र वावरे, वैभव आहिरे, सागर होले, कविता गोसावी, भारती नजरधने या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












