loader image
[ays_poll id=7]

चिंतामणी लॉन्स येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न

Jun 12, 2023


मनमाड – आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.
आमदार आपल्या दारी या महा शिबिरातून हजारो नागरिक विविध सुविधांचा लाभ घेत आहेत.
सामान्य नागरिकांना विविध आजार तपासणी, उपचार, औषधे मोफत दिली जात असून शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळवून दिला जात आहे.
चिंतामणी लॉन्स मनमाड येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित राहून शिबिराची सुरुवात केली. या प्रसंगी बोलतांना प्रत्येक नागरिकांची आरोग्याची काळजी घेणे तसेच त्यांना आवश्यक असलेली शासकीय सुविधा घरपोच उपलब्ध करून देऊन त्यांचा होणार त्रास कमी करणे हाच प्रामाणिक हेतू ठेवून संपूर्ण मतदारसंघात हे महाशिबिर राबविले जात असल्याचे सांगितले.
आधीच्या आलेल्या प्रकरणातून आज झालेल्या शिबिरात अपंगत्वाचा दाखले, रेशन कार्ड , निराधार योजना प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वाटण्यात झाले. या प्रसंगी सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर, डोळे तपासणी , मोफत चष्मे, इतर सामान्य आजार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली तर सर्व शासकीय योजनांचे स्टाल लावण्यात आले होते. तहसील विभाग, पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या. रेशन कार्ड संबंधी सर्व अडचणी, निराधार योजना, इतर दाखले यात सामील आहेत.
युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, राजेंद्र पगारे, बबलू पाटील, जेष्ठ नेते अल्ताफबाबा खान, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, वैद्यकीय मदत कक्ष विकास वाघ, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, नगरसेवक संतोष आहिरे संजय निकम, इरफान मोमीन,शिवसेना शहर सचिव बापू वाघ, गुलाब जाधव, माजी नगरसेवक अमजद पठाण, अमिन पटेल, गालिब शेख, दऊ तेजवाणी, पिंटू शिरसाठ, आप्पा आंधळे, राकेश ललवाणी,उमेश ललवाणी, विलास परदेशी, गोकुळ परदेशी, विकी कातारी,अनिल पवार, बंटी शाह, सुभाष माळवतकर, ललित रसाळ, महेंद्र वाघ, लोकेश साबळे, लाला नागरे, रिपाई सचिव प्रमोद अहिरे रवींद्र खैरनार शिरीष पगारे, वैद्यकीय मदत कक्षेचे सुनील साळवे, अतुल वानखेडे, तमिज पठाण, मन्नू शेख, ऋषिकांत आव्हाड, अजिंक्य साळी, सनी बागुल, सिद्धार्थ छाजेड, निलेश व्यवहारे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर आदीसह
शिवसेना महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .

लाभार्थी आकडेवारी

डोळे तपासणी १२४६
चष्मे वाटप १०८३
रेशन कार्ड प्रकरण २४२
निराधार योजना १६
उत्पन्न दाखले १२८
जातीचे दाखले ५४
Domocile ३६
MD Medicine १०२
Orthopaedic १७८
Cardio १२६
बाल रोग तज्ञ ५२


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.