loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदे यांचे “आमदार आपल्या दारी” महाशिबीराचे गुरुवारी गांधी चौक येथे आयोजन

Jun 14, 2023

मनमाड :- आमदार आपल्या दारी अंतर्गत आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नागरीकांना मोफत आरोग्य सुविधा व शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याअंतर्गत गुरूवार दि. १५ जून रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत भव्य शिबीराचे आयोजन महात्मा गांधी चौक मनमाड येथे करण्यात आले आहे. या अंतर्गत मोफत फिरता दवाखाना व मोफत शासकीय सुविधा देण्यात येणार आहेत. सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करतील. योग्य सल्ला व औषधे मोफत दिली जाणार आहेत. तसेच सर्व शासकीय योजना, रेशनकार्ड संबंधी सर्व अडचणी आणि इतर दाखले मोफत काढून दिले जाणार आहे. नागरीकांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. सुहास आण्णा कांदे व सौ. अंजूमताई सुहास कांदे यांनी केले आहे. निराधार योजनेचे लाभार्थी व त्याची कागदपत्रे आणि इतर दस्ताऐवज, उत्पन्न दाखला, डोमीसाईल, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलिअर, जातीचा दाखला आदी सर्व मोफत काढून देण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी शिबीरात येतांना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे असे आवाहनही करण्यात आले आहे. याआधी मालेगांव रोड, किर्ती नगर व आनंद विहार भागात झालेल्या या कार्यक्रमास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

अजून बातम्या वाचा..

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more
.