loader image
[ays_poll id=7]

नागापूर येथे मोठ्या उत्साहात आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न

Jun 17, 2023


आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज नागापूर येथे भालूर गटातील पानेवाडी गटासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे आज मोठ्या संख्येने पानेवाडी गणातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच विविध शासकीय दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात आणि म्हणूनच या शिबिराच्या माध्यमातून त्यांना तात्काळ विविध दाखले व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा हेतू मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे यांनी उपस्थित राहून आलेल्या नागरिकांशी संवाद साधला, प्रत्येक स्टॉल वर जाऊन भेट घेतली.
रेशन कार्ड संबंधित विविध त्रुटी अडचणी तसेच विविध निराधार योजना विधवा पेन्शन योजना व इतर शासकीय दाखल्यांसाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली.
आरोग्य सुविधा, महावितरण तहसील, पंचायत समिती, डोळे चेकप असे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.
राज्य कृषी अभियांत्रिकी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रंजना पवार नागापूर यांना ट्रॅक्टर देण्यात आले. दिव्य ज्योती प्रभात संघ अंतर्गत अगस्त महिला ग्राम संघ यांना 1.20 लक्ष तर तुळजा भवानी महिला समूह वाखारी यांना 60 लक्ष रुपयांचा CIF वाटप केला. नारीशक्ती महिला समूह धानेर यांना 1.50 लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. तसेच बचत गटाच्या महिलांना उन वारा पाऊस या पासून संरक्षण होण्यासाठी इव्हेंट स्टॉल स्टँडि देण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, प्रमोद भाबड, तालुका अध्यक्ष साईनाथ गीडगे, माजी जिल्हा परिषद गटनेते , नागापूर चे सरपंच राजाभाऊ पवार, मनमाड चे मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, दामू अण्णा डघळे पाटील, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, बाजार समितीचे संचालक किशोर भाऊ लहाने, दशरथ आप्पा लहिरे, बाजार समिती माजी सभापती प्रकाश घुगे, माजी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मा. सभापती राजेंद्र वाल्मीक पवार, बाजार समितीचे माजी सभापती अंकुश तात्या कातकडे, , पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर भाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब आव्हाड, शिवसेना उपतालुका प्रमुख राजाभाऊ देशमुख, अमोल नावंदर, राजाभाऊ सांगळे, पंकज जाध, सोमनाथ घुगे, वाल्मीक हेंबाडे, पिंटू व्हडगर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी ,शिवसैनिक, पानेवाडी गणातील संपूर्ण गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेरमन उप चेरमन सर्व सदस्य व इतर लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.