शहरातून वाहणाऱ्या पांझण रामगुळणा नदीपात्राची स्वच्छता नगर परीषदेच्या वतिने रामगुळणा पांझण नदी पात्राची जे सीबी च्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे. पावसाळा सुरु होत असुन त्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे , मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या अधिपत्याखाली रामगुळणा पांझण नदीपात्राची पुलाच्या मोऱ्या, नदीपात्रातील पाणवेली गाळ काढला जात आहे. मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी शहरातील नाले, गटारी, भुयारी चेंबर, रस्त्यांच्या स्वच्छतेबाबत सुचना केली. पावसाळ्यापुर्वी आपत्कालीन संकटांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी अग्निशमन दल यांच्या सह अत्यावश्यक समिती आधीच तयार करण्यात येत आहे.
यावेळी फरहान खान, मयुर बोरसे , राजाभाऊ आहिरे , साईनाथ गिडगे, गंगाभाऊ त्रिभुवन , बबलू पाटील इरफान मोमिन , अमजद पठाण , अमिन शेख, पापा शेख , सुनिल साळवे संजय बहोत , सतिश चावरिया आदी सह नागरिक उपस्थित होते. आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने आणि फरहान खान यांनी स्वच्छता पाहणी दौरा केला. तसेच पालीकेचे मुख्याधिकाऱ्यानी नागरीकांना सुचना केल्या . नदीपात्र आणि ओपन प्लेसवर उघड्यावर , बांधकामाचे मटेरीयल घाण,केर कचरा टाकुन डंपिंग करू नये, असे आढळून आल्यास नियमानुसार कारवाही करण्यात येईल असे सांगितले.











