loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात कै. लोकनेते तुकाराम बारकू सोनवणे यांना विनम्र अभिवादन.

Jun 22, 2023

मनमाड – दि.21 – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कै. लोकनेते तुकाराम बारकू सोनवणे यांची 29 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए व्ही पाटील व महाविद्यालय विकास समिती सदस्य अलकाताई शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनमाड शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी लोकनेते तुकाराम बारकू सोनवणे यांनी आपली 4 एकर 19 गुंठे जमीन महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेला विना अट देणगी म्हणून दिली. आज हजारो विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत त्यांच्या या कार्यातून समाजाप्रती असणारा त्यांचा उदार दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो व कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या शैक्षणिक कार्यात लोकनेते तुकाराम बारकू सोनवणे यांचे योगदान न विसरता येण्याजोगे आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले
याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य अलकाताई शिंदे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी एल शेंडगे , कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य श्रीमती ज्योती पालवे, कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे, सर्व प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप ढमाले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.