शिंगवे गावातील शिंदे वस्तीवर अखेर शासकीय पाण्याचे टॅंकर सुरू झाले. शिंदे वस्तीवर अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई भासत होती या संदर्भात सरपंच आत्माराम खताळ तसेच भाजपाचे चांदवड तालुका सोशल मीडिया व संपर्कप्रमुख किरण बोरसे यांनी पाठपुरावा करून त्यास यश आले व शिंदे वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. या कामी आमदार डॉ राहुल आहेर, चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी महेश पाटील,पाणीपुरवठा अधिकारी मोरे, ग्रामसेवक सुनील सोनवणे आदींनी या कामी सहकार्य लाभले. याप्रसंगी सरपंच आत्माराम खताळ,अशोक खताळ, किरण पुंजाराम झाल्टे, दादा शिंदे, सागर शिंदे, संदीप शिंदे, बाळू शिंदे, नाना गुंड, रमण डावरे, यादव शिंदे, सर्व शिंदे वस्तीवरील नागरिक तथा महिला उपस्थित होत्या.
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान
मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...











