Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद सेवा केंद्रा चा ” जीवनरक्षक पुरस्काराने गौरव

Jun 24, 2023

मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून 17 वर्ष अविरत पणे रुग्णसेवा देणारे आनंद सेवा केंद्राला जीवनरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून सातत्याने एक ठिकाण एक दिवस एक रक्तपेढी असा अनोखा रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन नेहमी आपला मागील विक्रम तोडणाऱ्या आनंद सेवा केंद्राला अर्पण रक्तपेढीच्या मानाचा जीवन रक्षक पुरस्कारअर्पण रक्तपेढी नासिक द्वारे प्रदान करण्यात आला. रक्तदान क्षेत्रातील सातत्याने अतुलनीय निस्वार्थी कार्य करणाऱ्या संस्था ना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.मनमाड शहरात आरोग्य व रुग्ण सेवेत आपलो वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा ची ही निवड मनमाड शहराला अभिमानास्पद आहे सन २००६ साली आरोग्य सेवे साठी स्थापन झालेल्या आनंद सेवा केंद्रा तर्फे सन २००८ साला पासून सलग १५ वर्ष भगवान महावीर यांचे जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते गेल्या १५ वर्षात या शिबिराच्या माध्यमातून आनंद सेवा केंद्रा ने *२२०० पेक्षा ही जास्त रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. संपूर्ण विश्वा वर आलेल्या महाभयंकर कोविड -१९च्या संकट काळात सन २०२० मध्ये १६५ सन २०२१ मध्ये १५४ तर यंदा १७१ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.आणि गत १४ वर्षात आनंद सेवा केंद्रा च्या माध्यमातून हजारो रुग्णांना अति तातडी काळात ही रक्तदान संबंधित विशेष मदत करण्यात आली. अर्पण रक्तपेढी तर्फे नासिक येथील मध्ये आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये मविप्र चे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठयाचे कुलगुरू डॉ प्रा संजीवजी सोनवणे, सुप्रसिद्ध गजल गायक घनश्यामजी वासवाणी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ काकतकर,अर्पण रक्तपेढी चे सर्वोसर्वा प्रमुख नंदकिशोरजी ताथेड,आणि मान्यवरांच्या हस्ते जीवनरक्षक स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन हा गौरव करण्यात आला आनंद सेवा केंद्रा च्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष *कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी,दीपक शर्मा, अमोल देव,ललित धांदल,विनय सोनवणे,अनुप पांडे चेतन संकलेचा, नितिन अहिरराव, , संजय गांधी,प्रमोद भाबड ,यांनी स्वीकारला ह्या पुरस्कार चे खरे मानकरी आनंद सेवा केंद्रा च्या *रक्तदान चळवळीत नियमितपणे रक्तदान करणारे रक्तदाते च आहेत म्हणून हा पुरस्कार त्या निस्वार्थी रक्तदात्या ना समर्पित असून सर्वाच्या सहकार्य ने हा रुग्ण सेवेचा यज्ञ पुढे ही सुरु राहील असे याप्रसंगी कल्पेश बेदमुथा व योगेश भंडारी यांनी सांगितले ह्या पुरस्कारा मुळे आनंद सेवा केंद्राचे चे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

 

अजून बातम्या वाचा..

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]