loader image
[ays_poll id=7]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

Jun 26, 2023

मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ते बंद करण्यात आले आहे.सदर काम मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसारच करून बोगस कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही. एन. दराने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी विशेष प्रयत्न करत मंजुरी आणून, सदर पुतळ्याला ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेघडबरीसह पूर्णाकृती बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र सदर ठेकेदाराने महाराजांच्या पुतळ्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने काम बंद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही. एन. दराने यांना निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या बांधकामाचे आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने अनेक चुका आढळून आल्या आहेत. ठरलेल्या मानकानुसार काम होत नाही. महाराष्ट्राचे आराध्य देवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे बांधकाम अंत्यात निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बांधकामासाठी वापरलेले बांधकाम साहित्य, वाळू, सिमेंट, खडी, लोखंडी सळई आणि इतर साहित्य हे हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे सदर काम थांबविण्यात आले असून अशीच स्थिती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत झाली आहे. त्यामुळे ५० लाख रुपये निधी मंजूर असताना सदर बांधकाम निकृष्ट होत आहे. मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार का केले जात नाही. याकडे पालिकेच्या किंवा संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा दर्जा तपासणारे करतात तरी काय असा सवाल आहे. बांधकामात मोठा गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी, संबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे. सदर पुतळ्याचे बांधकाम हे अनुभवी स्थानीक बांधकाम व्यावसायिकास द्यावे, बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांची समिती स्थापन करावी त्यात वेगवेगळ्या नागरिकांचा समावेश असावा. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छोडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वीच अर्धाकृती पुतळ्यांना ऐतिहासिक महत्व आहे. हे पुतळे म्हणजे शहराचा वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा ठेवा आहे. त्यामुळे सदर पुतळ्यांना कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था, संघटनांना न देता त्याचे पालिकेच्या वतीने जतन व्हावे, पालिकेच्या नियोजित नवीन इमारतीत दर्शनी भागात त्यांची स्थापना केली जावी. तो पर्यंत सध्याच्या पालिका इमारतीत त्यांची सन्मानपूर्वक स्थापना करावी अशी मागणीही केली आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
.