loader image
[ays_poll id=7]

राजसत्तेचा वापर जनतेच्या शिक्षणासाठी करणारे शाहू महाराज खरे राजर्षी – अलका नागरे – साळवे

Jun 29, 2023


मनमाड :- ”आपल्या लेकरांना शिक्षण न देणाऱ्या पालकांना दंड देणारे राजर्षि शाहू महाराज, बहुजन- ओबीसींना शिक्षणाच्या क्षेत्रात आणणारे पहिले छत्रपती नाहीत तर क्रांतीबा महात्मा फुले यांच्या नंतर सर्वात मोठी शैक्षणिक क्रांती करणारेही पहिले छत्रपती आहेत. सामान्य जनतेचा जीवनात शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन राजसत्तेचा वापर प्रथमतः जनतेसाठी करणारे शाहू महाराज हे खरोखर राजर्षि होते,” असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीतील तरुण – अभ्यासू कार्यकर्ती अलका नागरे-साळवे यांनी केले.
राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्ताने मनमाड बचाव समिती, सत्यशोधक मंच, जनहित विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. मनोज गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात ” ओबीसी आरक्षण आणि राजर्षि शाहू महाराज” या विषयावर अलका नागरे बोलत होत्या.
”विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात प्रथम पारित केला तर ओबीसी समाजातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैलजोडी देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरचे ते दुसरे छत्रपती होते. आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गोठविले जात असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करून आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून महागडे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु असून आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या ओबीसी बहुजनांना,शेतकऱ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले जात आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न ओबीसी समाजासमोर असताना धर्म-जात यांच्या झगड्यात ओबीसींना गुंगविले जात आहे. ओबीसींनी हे कारस्थान एकजुटीने हाणून पाडले पाहिजे,” असे आवाहनही नागरे यांनी केले.
प्रारंभी मुस्लिम पखाली(भोई) समाजाच्या वयोवृद्ध कार्यकर्त्या खुर्शीदबी शेख यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करण्या आले. मनमाड शहरातील विविध ओबीसी समाजातील ३७ घटक जातींनी मेळाव्यात सहभाग दिला असता घटक समाजाच्या प्रमुखांचा रामदास पगारे, कमल जाधव, सतीश केदारे, अलका नागरे, रश्मी मोरे, मोतीराम भालेराव, मनोज गांगुर्डे, सुनीता महाले व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वश्री सदाशिव सुतार, नरेंद्र कांबळे, भागीनाथ सोनार, सतीश केदारे आदींनी मनोगतातून ओबीसी एकतेचे आवाहन केले. शाहीर अर्जुन साळवे यांनी ‘ ओबीसी डेटा कुठं हाय वो ‘ हे गीत गाऊन सर्वांची वाहवा मिळवली. सूर्यकांत राजगिरे, अशोक परदेशी, राम महाले आदींनी प्रास्ताविकातून विविध भूमिका मांडल्या. आर.बी. ढेंगळे, चंद्रकांत जाधव, महेश दारुंटे, अमर चव्हाण आदींनी संयोजन केले. रतन निकम यांनी आभार प्रदर्शित केले. सुषमा तिवारी, सुनीता राजगिरे, शांताबाई पटवार, सुरेश वाघ आदींनी सह्योग दिला.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.