नांदगाव i
नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील सारताळे येथे आज सकाळी फरशीवरून घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारताळे येथील कु.सिद्धी भैय्यासाहेब बोरसे(१६) ही आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी जात असतांना अचानक फरशीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला.यावेळी तिच्या आईवडिलांनी तात्काळ गावातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुन्हा नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. सिध्दीने दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली होती व पुढील शिक्षणासाठी आता नांदगाव येथे ॶॅडमिशन घेतले होते.तीच्या दुर्देवी मृत्यूची घटना गावात व शाळेत समजताच हळहळ व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन
मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...








