loader image
[ays_poll id=7]

द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

Jun 29, 2023

नंदु ढिलोर नाशिक प्रतिनिधी नाशिक रोड जेल रोड :- ब्लूबेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी अतिशय जल्लोष व आनंदी वातावरणात साजरी झाली. छोट्या बाळ गोपाळ वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भक्ती भावाने भजन कीर्तन केले तसेच शिक्षिका स्नेहल भुसारे यांनी आषाढी एकादशी बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल कदम यांनी विठुरायाची आरती करत मिरवणुकीला सुरुवात केली.

विठुरायाची पालखी चे प्रमुख आकर्षण म्हणजे छोटे वारकरी वेशातील विद्यार्थ्यांची पायी वारी परिक्रमा व विठुरायाच्या वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, जनाई व विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी हे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधी ठरले.

विठू नामाच्या जय घोषात नारायण बापू नगर येथे आषाढी रिंगण सोहळा पार पडला शाळेचे विद्यार्थी लेझीम पथक, झेंडा पथक, यांनी विठुरायाच्या पालखीला रिंगण घातले, विद्यार्थिनींनी फुगडी चा आनंद लुटला परसरातील अनेक नागरिकांनी हा उत्साह पाण्यास एकच गर्दी केली.

कार्यक्रमाचे सांगता श्री अमोल कदम मुख्याध्यापक ब्लूबेल इंग्लिश मीडियम स्कूल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री अमोल कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी सोहळा आनंदात पार पडला तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.