loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शिवस्फूर्ती मैदान येथे आमदार आपल्या दारी शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Jul 1, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून आमदार आपल्या दारी एक महा शिबिर राबविण्यात येत असून आज नांदगाव येथे नगरपालिकेसमोरील शिवस्मृती मैदानावर आमदार आपल्या दारी महा शिबिर संपन्न झाले.
गेल्या महिन्याभरापासून नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये आमदार आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत विविध शासकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
यामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी मोफत चष्मे विविध आजारांवरील उपचार औषधे रक्त तपासणी करून दिली जात आहे.
रेशन कार्ड संबंधित अडचणी नवीन रेशन कार्ड दुय्यम रेशन कार्ड विविध प्रकारचे निराधार दाखले व इतर दाखले या ठिकाणी काढून दिले जात आहेत.
आज नांदगाव येथे संपन्न झालेल्या आमदार आपल्या दारी या शिबिरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये नांदगाव नगरपालिका, शासकीय रुग्णालय नांदगाव महावितरण भूमि अभिलेख पंचायत समिती व तहसील असे विविध स्टॉल होते.
नांदगाव शहरांमध्ये तीन शिबिरे होणार असून आज पहिले शिबिर शिवस्फूर्ती मैदान नांदगाव नगरपालिकेसमोर संपन्न झाले. शरअंतर्गत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थिती लावली तसेच विविध सुविधांचा लाभ घेतला.
नांदगाव शहरात विविध प्रकारचे मोफत सुविधा महा शिबिर पहिल्यांदाच होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे, उज्वलाताई खाडे, मुख्याधिकारी विवेक धांडे , डॉक्टर ख्याती तुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे नगराध्यक्ष राजेशजी कवडे विष्णू निकम सर, प्रमोद भाबड युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप शहर प्रमुख सुनील सोनवणे सागर हिरे, बाजार समितीचे संचालक कान्हा कलंत्री अमोल नावंदर दीपक मोरे, आनंद कासलीवाल बाळासाहेब शेवरे साईनाथ पवार प्रदीप कासलीवाल रमेश काकळीज, भास्कर कासार, बाळासाहेब कवडे, वामन पोतदार, मुन्ना शर्मा सर, राजाभाऊ पवार संजय आहेर, एन के राठोड, संजय सानप, डॉ.गणेश चव्हाण, राजाभाऊ पवार, , भाऊराव बागुल, अय्याज शेख, शशी सोनवणे, संतोष भोसले,कपिल तेलोरे, युवा सेना शहर प्रमुख मुज्जू शेख, महेंद्र आहेर सतीश बोरसे ज्ञानेश्वर खैरनार, भाऊराव पाटील, राजाभाऊ गुप्ता, महेंद्र गायकवाड, आदीसह
शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणी मोरे, तबसुम सैय्यद, भारती बागोरे सोनिया सोर , रेणुका बाहिकर उपस्थित होत्या.
ॲड.सचिन साळवे यांनी सूत्रसंचालन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.