loader image
[ays_poll id=7]

शिवसेना कार्यकर्त्यांप्रती आमदार सुहास आण्णा कांदे यांचा दिलदारपणा…

Jul 1, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आमदार सुहास अण्णा कांदे हे सतत मतदारसंघाच्या विकासासाठी सक्रिय असतात तसेच सामाजिक कार्यात सतत गरजवंतांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली.
काही दिवसापूर्वी साकोरा येथील तरुण महेश सुदाम बोरसे यांचे वैयक्तिक वादातून डोक्यावर वार करण्यात आल्यामुळे कवटी फुटेपर्यंत मोठी जखम झाली होती. त्यांना तात्काळ नाशिक येथील सोपान हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अत्यंत आला की च्या परिस्थितीत डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी सहा लाखांच्या वर खर्च सांगितला. महेश बोरसे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे.
मतदार संघातील सार्वजनिक कामे सामाजिक कामे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहून आमदार सुहास अण्णा कांदे त्यांना आर्थिक तसेच सर्व प्रकारची मदत करत असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये संसाराची कोटी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना पुन्हा संपूर्ण संसार भेट देऊन कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ते सतत निभावत असतात.
आज साकोरा येथील तरुण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांनी मतद केलीच पण तात्काळ पुढील सहकार्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
हॉस्पिटलचे बिल भरण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नसल्याने नातेवाईक व कर्ज काढून त्यांनी पैसे जमवले सदर सर्व माहिती साकोरा येथील शिवसेना पदाधिकारी शरद भाऊ सोनवणे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कानावर टाकली असता आज संबंधितांना आज आमदार निवासस्थानी बोलवण्यात आले असता आमदार सुहास अण्णा कांदे यांनी 50 हजार रुपयांची रोख मदत केली. सोबतच संबंधित हॉस्पिटलला संपर्क करून कमी करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला, तसेच तात्काळ सूचनाही केल्या.
याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी शरद सोनवणे प्रवीण पवार गणेश बोरसे वैभव बोरसे सुरज बोरसे पवन बोरसे सचिन बोरसे गणेश बच्छाव देवेंद्र बोरसे काशिनाथ बोरसे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.