loader image
[ays_poll id=7]

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

Jul 3, 2023


 

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग पॉड्स से उदघाटन कार्यक्रमासाठी आले असता नॅशनल रेल्वे मजदुर युनियन टी.एम.डबल्यू शाखेने भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सचिन दराडे यांच्या मार्गदर्शना खाली मध्य रेल्वेच्या नाशिक रोड येथील कर्षण मशिन कारखाना इथे 50 एकर जागा खाली आहे,वीज केंद्र जवळ असल्यामुळे वीज उपलब्धता आहे,कुशल कामगार आहे त्यामुळे या कारखान्याच्या विस्तार करून इलेक्ट्रिक इंजिन लोको शेड,रेल्वे इंजिन ट्रान्सफार्मर उत्पादन/रिपेअर,मेंमु ट्रेन कोच रीपेअर इत्यादी चा प्लांट लावून विस्तारीकरण करावे ज्यामुळे नाशिक का रोजगार निर्मिती होईल व उद्योगांना चालना मिळेल.या कारखान्यातील कामगारांची रिक्त पदे भरण्यात यावी, अन्य विभागातून बदलीवर आलेल्या कामगारांच्यावरचा अन्याय दूर करावा,या कारखान्याला लागणारा कच्चे सामान वेळेवर पुरवण्यात यावे या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत . निवेदनावर एन आर एम यू शाखा अध्यक्ष श्री.अनिल दराडे व सचिव श्री.व्ही के चौधरी यांच्या सह्या होत्या व निवेदन देताना,राजू वाघ,मधुकर सांगळे,गजानन शेळके,निलेश राऊत,अरुण बोर्डे,प्रसाद सुर्यवंशी,कुणाल भोसले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.