Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे – मनमाड च्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Jul 6, 2023

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे मनमाड चे माजी आमदार राजाभाऊ देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हा प्रमुख नाना शिंदे, भैयासाहेब देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची निकड व भावना आपण स्वतः: आरक्षणाच्या लढ्यातील योध्दे असल्याने जाणून आहात. परंतु न्यायालयीन लढयात तांत्रिक अडचणींमुळे आलेल्या अपयशामुळे संपूर्ण समाज हा प्रचंड निराशेच्या गर्तेत गेला आहे. शैक्षणिक आरक्षण नसल्यमुळे युवक वर्ग हा हताश झाला आहे. व त्याचा परिणाम स्वरूपी व्यसन, गुन्हेगारी तसेच आत्महतेसारख्या विचाराप्रत पोहोचत आहे. दिवसेंदिवस समाजाची परिस्थिती बिकट होत आहे. कुणबी व मराठा एकच असल्याचे विविध आयोगामार्फत सिद्ध होऊनही कायद्याच्या कचाट्यात हा विषय अडवून पडला आहे.

आपल्या सरकारच्या कामाचा वेग व न्याय देण्याच्या पद्धतीचा विचार करता आपल्या सरकारकडून यावर निश्चित मार्ग निघेल, अशी अपेक्षा समाजाला आपल्याकडून आहे. या लढ्यात ९२ सालापासून संघर्षमय प्रवास आमचा सुरु आहे व त्यासाठी आयोगाकडे सर्व नांदगाव तालुक्यातील सर्व विविध समाजांचा पाठिंब्याचे पत्र असलेल्या फाईल्स दाखल केलेल्या आहेत. तरी आपण न्यायालयीन प्रक्रियेत व्यक्तिशः लक्ष देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.

अशी संपूर्ण मराठा समाजाची आपल्याकडून अपेक्षा आहे. यासाठी केंद्राकडेही पाठ पुरवठा करावा अशी कळकळीची विनंती सकल मराठा समाज नांदगाव तालुक्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]