Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सप्तशृंगी गडाच्या घाटात बस दरीत कोसळली – अनेक प्रवाशी जखमी

Jul 12, 2023

आज पहाटे ६.३० च्या दरम्यान सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यावेळी बसमधून प्रवास करणारे अंदाजे ३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली. दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड वासीयांना सुखद बातमी : शहरात उभारले जाणार तीन जलकुंभ तर करंजवण येथील जॅकवेल चे १५ मीटर काम पूर्णत्वाकडे

मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ...

read more
मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी

मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच...

read more
महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड

हरनुल ता.चांदवड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]