loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थ्याची एम.पी.एस.सी. मार्फत मंत्रालयात महसूल सहाय्यक पदी निवड

Jul 14, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी कु. जाधव सागर साहेबराव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक पदासाठी परीक्षेत महाराष्ट्रातून 47 वी रँक प्राप्त झाली. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने व संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहेत. सागर या विद्यार्थ्याने महाविद्यालयातून 2015 या वर्षी इंग्रजी या विषयातून पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयात असतानाच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याची आवड तयार झाली होती. कु.जाधव सागर साहेबराव हा विद्यार्थी चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु या गावातील असून वडील हे शेती व्यवसाय करतात. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याकारणाने सागर या विद्यार्थ्याने पुणे या ठिकाणी एक वर्ष क्लास करून परत आपल्या मूळ गावी येऊन घरीच सलग दोन वर्षे अभ्यास करून या पदाला गवसणी घातली. महाविद्यालय मार्फत कु.जाधव सागर या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम सर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यापुढेही न थांबता राज्यसेवा परीक्षा देऊन वरील पदावरती नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समन्वयक प्राध्यापक डाॅ. गणेश गांगुर्डे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. जी. एल. शेंडगे, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे, नॅक समन्वयक प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे,इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका कविता काखंडकी मॅडम, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक जे.डी.वसाईत, प्रा.प्रकाश बर्डे, प्राध्यापक एम.डी. आहिरे तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.