loader image
[ays_poll id=7]

समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्य : राजेंद्र पगारे

Jul 18, 2023


 

मनमाड(प्रतिनिधी):- गेल्या सोळा वर्षांपासून अनेक अडीअडचणीचा सामना करत अनेकांचा विरोध पत्करत फुले शाहु आंबेडकर यांच्यासह इतर सर्वच महापुरुषांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे तसेच तळागाळातील घटकापर्यंत पोहचवण्याचे काम फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच करत असुन आता भविष्यात नांदगाव तालुक्यासह जिल्हाभर हेच काम नव्या पिढीने करावे असे प्रतिपादन मंचचे संस्थापक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी केले मंचच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी नुतन कार्यकारणीला नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी पगारे यांनी भारतात सुरू असलेल्या सद्यस्थितीबाबत वक्तव्य करत आता भविष्यात फ़ुले शाहु आंबेडकर यांच्याच समतावादी विचारांची गरज असुन ते जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. आज फ़ुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हाजी रफिक बाबुजी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनचे झोनल सचिव सतिष केदारे,सिटू संघटनेचे नेते रामदास पगारे,मंचचे अध्यक्ष मिरझा अहमद बेग,हाजी शफीक,मौलाना तौसिफ,रईस मंसुरी, हाजी मुश्ताक सर,मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख,येवला येथिल सबुरभाई मोमिन आदीजन उपस्थित होते.यावेळी सतिष केदारे यांनी आपल्या भाषणात संविधानांमुळे आपण सर्व एक आहोत त्यामुळे आपण देखील एकत्रित राहुन आपले संविधान कसे वाचवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले तर मौलाना तौसिफ यांनी आपल्या भाषणात फ़ुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे काम हे मानवतावादी असुन आपण इतर माणसांना माणुसकी म्हणुन मदत करणे हेच सर्व धर्म सांगतो व आपल्या संविधानात देखील माणुसकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे असे सांगितले. यावेळी गोपी कौराणी, आशिष भंडारी, अमोल पवार,ज्ञानेश्वर शिंदे,आमिन नवाब शेख,जावेद मंसुरी, शरद बहोत, सद्दाम आतार, जावेद शेख, इस्माईल पठाण,विनोद आहिरे,शकुर शेख, यांच्यासह इतर जणांना नविन पद देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास आहिरे यांनी केले तर फिरोज शेख यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

तालुक्यातील सर्व शाळा आदर्श करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु : सौ.अंजुमताई सुहास कांदे

  सौ.अंजुमताई कांदे यांची "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत जि.प.साकोरा शाळेस...

read more
भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

भरधाव बसने ट्रॅक्टरला दिली धडक, ट्रॅक्टर चालक ठार – मनमाड मालेगाव मार्गावर झाला अपघात

मनमाड - मनमाड इंदूर महामार्गावर मालेगावरोडवर चोंढी घाटाजवळ एरंडगाव फाट्याजवळ एका अवघड वळणावर भरधाव...

read more
खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

मनमाड - चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा...

read more
दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
.